पंचायतराज समिती नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर,या तीन दिवस दौरा

पंचायतराज समिती नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर,या तीन दिवस दौरा

नांदेड : पुढील महिन्यात 2 ते 4 स्पटेंबर कालावधीत पंचायतराज समिती (PRC) नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. समितीचा दौरा निश्‍चित झाल्यापासून जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांची झोप उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विभागप्रमुखसह कर्मचाऱ्यांची धावपळ वाढली आहे. तयारी संदर्भात बैठकांचा दौर सुरु आहे. अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर येत असून प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत. Legislative Panchayat Raj Committee on a tour of Nanded district

पंचायतराज समिती (Panchayat Raj Committee) येत्या 2 ते 4 स्पटेंबर रोजी जिल्ह्यात येत आहे. तीन दिवस या समितीचा जिल्ह्यात मुक्काम असेल. आमदार संजय रायमुलकर (MLA Sanjay Raymulkar) अध्यक्ष असलेल्या या समितीत प्रदीप जयस्वाल, कैलास पाटील, डॉ. राहुल पाटील, अनिल पाटील, संग्राम जगताप, दिलीप बनकर, शेखर निकम, सुभाष धोटे, माधवराव जळगावकर, प्रतिभा धानोरकर, हरिभाऊ बागडे, डॉ. विजयकुमार गावित, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, डॉ. संजय कुटे, राणा जगजितसिंग पाटील, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, किशोर जोरगेवार, अंबादास दानवे, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, निरंजन डावखरे, सुरेश धस यांचा समावेश आहे. विशेष निमंत्रित म्हणून किशोर पाटील, जयंत पाटील, बाळराम पाटील आणि किशोर दराडे यांचा समावेश आहे. 2 या समितीचे आगमन होईल. Legislative Panchayat Raj Committee on a tour of Nanded district

सकाळी दहा ते साडे या वेळेत समितीचे सदस्य जिल्ह्यातील विधान मंडळाच्या Legislative Assembly सदस्यांशी शासकीय विश्रामगृहात अनौपचारिक चर्चा करतील. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढवा बैठकीत लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी साक्ष घेतील. त्यानंतर काही पंचायत समित्यांना समिती भेट देणार आहे. 3 स्पटेंबर रोजी जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, ग्रामपंचायतींना भेटी देतील. पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांचे साक्ष घेतील.

दि. 4 स्पटेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या 2016-17 ते 2017 -18 या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य अधिकाऱ्यांशी साक्ष घेतील. पंचायतराज समिती येणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख प्रलंबित कामे, अहवाल, रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी धावपळ करीत आहे. सुटीच्या दिवशीही रात्र उशिरापर्यंत कामे उरकणे सध्या सुरू आहे. Legislative Panchayat Raj Committee on a tour of Nanded district

==========================================================================================

<

Related posts

Leave a Comment