नांदेड (जिमाका), दि. 8 :- राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन जनजीवन पूर्वरत करण्याच्यादृष्टिने अटी व शर्तीच्या अधिन राहून शाळा, मंदिरे, प्रार्थनास्थळ खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे व येत्या काळात असलेल्या विविध सण व उत्सवामुळे होणारी गर्दी आणि यामुळे वाढू शकणारा संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थी यांना कोरोना लसीच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानांवर यापुढे ज्या शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण केले आहे अशाच लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यात जनतेच्या आरोग्याला अधिक प्राधान्य देऊन संभाव्य धोका व कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी हे आदेश परिपत्रकान्वये निर्गमीत केले आहेत. लाभार्थ्यांसह जनतेनेही लसीकरणासाठी अधिकाधिक उत्स्फुर्त सहभाग यात घ्यावा, असेही स्पष्ट केले आहे. ज्या व्यक्तींनी लसीचा एक डोस घेतला आहे त्यांना दोन डोस घेतलेल्या लाभार्थ्यांनंतर प्राधान्य दिले जाईल हेही स्पष्ट केले आहे.
Considering the situation of Corona in the state, it has been decided to open schools, temples and places of worship subject to terms and conditions. Considering the crowds due to this and the upcoming festivals and celebrations and the increased risk of infection due to this, it was decided to give priority to all the ration card holders in the district subject to the terms and conditions of corona vaccine. Presented by Vipin Itankar.
At all the cheap food shops in the district, it has been decided to give first priority to the beneficiaries who have completed two doses of Corona vaccine. These orders have been issued in a circular to give more priority to the health of the people and to avoid the third wave of potential danger and corona. It has also been clarified that the public along with the beneficiaries should be more involved in vaccination. It has also been clarified that individuals who have taken one dose of the vaccine will be given preference after the beneficiaries who have taken two doses.
============================================================================================
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
- देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी