Maharashtra HSC Result 2021 Formula declared | GR आला, बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला-असे होणार मुल्यमापन
मुंबई: महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या सूत्रानुसार मूल्यमापन करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात येतील. (Maharashtra HSC Result 2021 Formula declared by Government SSC FYJC and HSC internal evaluation consider for final Result)
इयत्ता 10 वीच्या गुणांना 30 टक्के भारांश
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.इयत्ता अकरावी 30 टक्के भारांश
इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण
इयत्ता बारावीसाठी 40 टक्के भारांश
बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.
बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज
बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे.
बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.
विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षा रद्द
सन 2020-21 या शौक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करता रद्द करण्यात येत आहे. इयत्ता 12 वी च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे. इयत्ता बारावीची परीक्षा रद्द केल्यामुळे, अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच गुणपत्रक /प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक क्रमांक 202106111 720454121 असा आहे.
हे ही लेख वाचा ——————-
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टि पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर..Maharashtra Government Announces Rs 31628 Crore Package for Flood Victims
- India -Pak Cricket|”मला त्याला मारायचं…”: पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदचं शिखर धावनवरून वादग्रस्त विधान, भारतीय चाहत्यांचा राग अनावर“I wanted to boxing him…”: Pakistani spinner Abrar Ahmed’s controversial
- आशिया चषक 2025 अंतिम सामना: भारताने पाकिस्तानला हरवून नववा विजेतेपद मिळवला!दुबई, 28 सप्टेंबर 2025: आशिया चषक 2025 (T20I स्वरूप) चा
- मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान: नद्यांना महापूर, शेतीचे मोठे नुकसानMarathwada Reels Under Torrential Rains and Floods: Massive Crop Damage
- निसर्ग संवर्धनासाठी माहूरमध्ये होत आहे पर्यावरण संमेलन; अशी करा नाव नोंदणीEnvironment conference organized at Mahur for nature conservation; presence of