माहुर प्रतिनिधी ( ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे ) :- मध्यानीच्या सूर्यनारायणाला साक्षी ठेवून आपल्या ” लाडक्या भायाला ” माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पार्थिवाला त्यांचे सुपुत्र कपिल नाईक यांनी अग्नीनारायणाच्या स्वाधीन करत भडाग्णी दिला.शासकीय इथमामात प्रदीप नाईक यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.प्रदीप नाईक अमर रहे या घोषाने दहेली तांडा परिसर गहीवरला. १-जानेवारीच्या सायंकाळपासूनच माजी आमदार प्रदीप नाईक यांचे पार्थिव दलेली तांडा येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले २-जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानातून तीरंगा ध्वजात ठेवलेल्या प्रदीप नाईक यांची अंतिम यात्रा महाप्रवासासाठी गावाशेजारील असलेल्या त्यांच्या शेतात आणण्यात आले.
अखेरचा निरोप देण्यासाठी सकाळी ९ वाजेपासूनच दहेली तांडा येथे महिला नागरिक विविध क्षेत्रातील राजकीय मंडळींनी एकच गर्दी केली होती यावेळी पोलीस दलाच्या वतीने तीन राउंडची फायरिंग ची सलामी देण्यात आली.यावेळी ना.संजय राठोड मृदा व जलसंधारण मंत्री मा.ना.इंद्रनील नाईक आदिवासी उद्योग उच्चतंत्र शिक्षण राज्यमंत्री प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा अधिकारी पांडुरंग बोरगावकर माजी मंत्री राजेश टोपे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील तहसीलदार शारदा चोंढेकर मा.ना. हेमंत पाटील आमदार भीमराव केराम अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे मा.मंञी सुर्यकांता पाटील माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर यांनी स्व, प्रदीप नाईक यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले यावेळी झालेल्या शोकसभेत माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे ,बाबुराव राठोड ,आमदार भीमराव केराम खा.नागेश पाटील आष्टीकर खासदार डॉ. बी डी चव्हाण माजी मंत्री राजेश टोपे ना. हेमंत पाटील ,अनिल देशमुख ना. इंद्रनील नाईक यांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करीत त्यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत आपल्या मनोगतातून भावपूर्ण श्रद्धांजली ही अर्पण केली
अंतिम संस्काराच्या वेळी तेलंगणाचे खासदार नागेश घोडाम आमदार बापूराव राठोड भीम टायगर सेनेचे दादासाहेब शेळके माजी आमदार चंद्रकांत दानवे संजय वाघचौरे राहुलजी मोटे विजय भांबळे वीरेंद्र जगताप माजी खासदार सुभाष वानखेडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर दानवे माजी आमदार विजयराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर माजी खासदार शिवाजीराव माने,माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण,आमदार बाबुराव कदम कोहळीकर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जनाबाइ डुडुळे, ज्योतीबा खराटे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश राठोड माजी सभापती अनिल पाटील कऱ्हाळे, प्रवीण मॅकलवार, सभापती गजानन मुंडे संचालक बालाजी बामणे उपसरपंच राजू सुरोशे, माजी सरपंच बाळू पवार दिग्रसकर.
सर्वच राजकीय पक्षाचे पदाधीकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे किनवट माहूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते महायुती आणि महा विकास आघाडीचे पदाधिकारी किनवट माहूर विदर्भ मराठवाडा शेजारील तेलंगणा राज्यातूनही मोठा जनसमुदाय महीला भगीनी आधीकारी कर्मचारी स्व. प्रदीप नाईक यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देहतांडा येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते या शोकसभेचे सूत्रसंचालन मनोज कीर्तने अरुण जाधव गजानन सोळंके मेघराज जाधव दुर्गादास राठोड दत्तराव मोहिते आदींनी केले.या वेळी वीस हाजारच्या वर जनसमुदाय उपस्थित होता.