राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ विकासासंदर्भात सरकारने उचलले हे पाऊल; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली बैठक वाचा सविस्तर

राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ विकासासंदर्भात सरकारने उचलले हे पाऊल; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली बैठक  वाचा सविस्तर

Deputy Chief Minister Ajit Pawar held a review meeting of Sindkhed Raja Development Plan

बुलडाणा, (जिमाका) दि. 21 :  राष्ट्रमाता माँ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेला सिंदखेड राजा चा विकास करणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. मात्र हा विकास करताना स्थानिक नागरिकांचे सहकार्य घेऊन विकास आराखडा करावा. येथील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र जी कामे होतील ती उत्कृष्ट दर्जाची व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.सिंदखेड राजा येथील पंचायत समिती सभागृहात सिंदखेड राजा विकास आराखडा आणि जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार किरण सरनाईक, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती,  मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अॅड नाझेर काझी आदी उपस्थित होते. The first duty of the government is to develop Sindkhed Raja, the birthplace of Mother Jijau

श्री. पवार म्हणाले,  सिंदखेड राजा चा विकास करताना निश्चित असा आराखडा तयार करावा आणि त्यानुसारच विकास कामे करावी.  येथील विकास कामे करताना पुरातत्त्व विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार येथील वास्तूंचे संवर्धन व्हावे.  या ठिकाणचा सर्वांगीण विकास झाल्यास येथील चित्र पालटून याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील.  त्यांच्यासाठी चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उभे राहण्याचे कार्य विकास आराखड्यातून व्हावे. या ठिकाणी होत असलेल्या विकासामुळे पर्यटकांना सर्व पर्यटन करायला दोन दिवसांचा वेळ लागेल.  त्यानुसार त्यांच्या निवासाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. पर्यटन स्थळांचा विकास होण्याअगोदरच या स्थळांच्या लगतचे अतिक्रमण काढावे. तसेच जमीन अधिग्रहण तातडीने करावे. (The first duty of the government is to develop Sindkhed Raja, the birthplace of Mother Jijau)

ते पुढे म्हणाले, सिंदखेड राजा येथे पर्यटनाच्या निमित्ताने व्यवसायांना उर्जितावस्था प्राप्त होणार असून लोणार- शेगाव अशी स्थळे ही सिंदखेड राजाला जोडण्यात यावी. पर्यटन स्थळांचा विकास करताना स्थानिकांची मदत घ्यावी. तसेच ही कामे उत्कृष्ट दर्जाची असावीत यावर भर द्यावा.  सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वस्तूंचे संवर्धन करताना या वास्तू पुन्हा खराब होणार नाही. या दृष्टीने ही कामे करावी. जिजाऊंचे जन्मस्थळ असल्याने शक्य असेल तेवढा निधी टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी मराठी,  हिंदी आणि इंग्रजी भाषेतील माहिती फलक लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

विकास आराखड्याच्या बैठकीमध्ये तेरा ऐतिहासिक वास्तू यांच्यासह वस्तुसंग्रहालय, विश्राम गृह, बंदिस्त नाली, वाहनतळ शहराचा बाह्यवळण रस्ता ही विकासकामे करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. (The first duty of the government is to develop Sindkhed Raja, the birthplace of Mother Jijau) Deputy Chief Minister Ajit Pawar held a review meeting of Sindkhed Raja Development Plan

पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वव्हाणे आणि केंद्रीय पुरातत्व विभागाचे श्री. अंगातईकर यांनी सिंदखेड राजा येथे पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती दिली. तसेच मुख्याधिकारी श्री. व्हटकर यांनी अन्य विभागांच्या प्रस्तावित विकास कामांचे सादरीकरण केले. बैठकीचे संचलन सहायक जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी केले. बैठकीला विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा ====

<

Related posts

Leave a Comment