नांदेड, दि. 7 :- नांदेड जिल्ह्यातील कोविड बाधितांचे प्रमाण शासन आणि नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे सद्यस्थितीत नियंत्रणात आले आहे. याचबरोबर कोविड उपचारात ऑक्सिजन बेड्सचे व्यापलेले प्रमाणही कमी झाले आहे. जिल्ह्यातील ही आकडेवारी लक्षात घेवून शासनाने नांदेड जिल्ह्याचा कोविड निर्बंध उठविण्याच्या पहिल्या स्तरामध्ये समावेश केला आहे. यामुळे जिल्ह्यातील निवडक सेवा, आस्थापना व उपक्रमांना मर्यादेत सुट देण्याचा निर्णय जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला. स्तर एक नुसार निर्बंध शिथीलीकरणाबाबत त्यांनी पुढील आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय व सुट असलेल्या खाजगी कार्यालये हे शंभर टक्क्यांसह सुरु राहतील. खेळ क्रीडा प्रकार नियमित सुरु राहतील. धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक / करमणुकीचे कार्यक्रम / मेळावे यांना नियमित सुरु ठेवण्यास सुट दिली आहे. जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट्स, मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रिनसह), नाट्यगृह नियमित सुरु राहतील. लग्न समारंभाला शंभर व्यक्तींची मर्यादा घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलींग नियमित सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा, अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा नियमित सुरु राहतील.
विविध बैठका, निवडणूक – स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा
यांना नियमितप्रमाणे होतील. जिल्ह्यातील बांधकाम नियमितप्रमाणे करता येईल. कृषि व कृषि पुरक सेवा, ई कॉमर्स – वस्तू व सेवा नियमित सुरु राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नियमितप्रमाणे निर्बंधाविना सुरु राहतील. मालवाहतूक ( जास्तीत जास्त तीन व्यक्ती,चालक /मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमित सुरु राहतील. खाजगी वाहने/ टॅक्सी/बसेस/लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास नियमित सुरु राहतील. परंतु, स्तर पाचमध्ये जाण्यासाठी किंवा स्तरमध्ये थांबा घेवून पुढे जाणाऱ्या प्रवाशांना ई-पास आवश्यक राहील.
उत्पादक घटक (निर्माणक्षेत्र) अंतर्गत निर्यात जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची आवश्यकता असलेली उद्योगक्षेत्र, लघु व मध्यम उद्योगासह युनिट्स नियमित सुरु राहतील. निर्माणक्षेत्र यात
अ] अत्यावश्यक वस्तू निर्माण करणारे उद्योग
ब ] सातत्याने व निरंतर चालु असणारी उद्योगक्षेत्र
क] राष्ट्रीय सुरक्षे करिता आवश्यक संसाधनांची निर्मिती करणारे उद्योग
ड] डाटा सेंटर, क्लाउड सर्विसेस, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र इत्यादी व इतर सर्व निर्माण क्षेत्र जे अत्यावश्यक तसेच निरंतर उद्योग या सदराखाली समाविष्ट नाहीत ते सर्व नियमितपणे सुरु राहतील.
व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स हे नियमित सुरु राहतील. अंत्यविधी, अंतयात्रेसाठी 50 व्यक्तींचे निर्बंध घालण्यात आले आहेत.
सदर आदेश साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील तरतूदीनुसार संदर्भात नमूद अधिसूचना दिनांक 14,मार्च 2020 अन्वये मला उक्त प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहेत त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नूसार प्रदान अधिकारान्वये जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिनांक 07 जनू,2021 रोजी पासून शासनाकडील
आदेशापर्यंत वरीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
- संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे..सदरील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील घटनेला आज 15 16 दिवस होऊनह मुख्य आरोपी अटक झालेली नाही. घटनेतील मास्टरमाइंड ही अटक नाहीत. प्रशासनाचा तपास … Read more
- किनवट जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ! २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी घोषणेची प्रतिक्षा…The issue of Kinwat district creation is under discussion again! Waiting for the announcement on 26th January Republic Day… माहुर प्रतिनिधी : (ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे … Read more
- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाबीड दि.२८ (प्रतिनिधी)- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना तातडीने अटक करावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी शनिवार (दि.२८) … Read more
- निरोगी आणि मजबूत जगण्यासाठी योग्य आहार आणि योग्य जीवनशैली जगण्यासाठी हे करून बघा..।दीर्घायुष्य या विषयावर प्रश्न विचारल्यावर चित्रपट रसिकांना ‘आनंद’ मधील “जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नहीं” सारख्या ओळी सांगू शकतात. तथापि, वास्तववाद्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. … Read more