मुंबई महाराष्ट्र विधानभवनात आमदार पडळकर-आव्हाड कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, ही आहे वादाची पार्श्वभूमी
A violent clash broke out between MLA Padalkar and Awhad activists at the Maharashtra Vidhan Bhavan in Mumbai.

मुंबई महाराष्ट्र विधानभवनात आमदार पडळकर-आव्हाड कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, ही आहे वादाची पार्श्वभूमी

मागील वादाची पार्श्वभूमी

या हाणामारीच्या मागे दोन्ही नेत्यांमधील जुना वाद कारणीभूत असल्याचे दिसते. बुधवारी, १६ जुलै रोजी विधानभवनाच्या गेटवर पडळकर आणि आव्हाड यांच्यात गाडीच्या धक्क्यावरून बाचाबाची झाली होती. यावेळी पडळकर यांनी आव्हाड यांना शिवीगाळ केल्याचा आणि गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. याशिवाय, गेल्या आठवड्यात आव्हाड यांनी पडळकर यांच्याकडे पाहून “मंगळसूत्र चोरांचा” अशी घोषणाबाजी केली होती, ज्यामुळे दोघांमधील तणाव वाढला होता.

धमकीचा आरोप

नेत्यांच्या प्रतिक्रिया

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: “विधानभवन हे लोकशाहीचे मंदिर आहे. अशा प्रकारच्या घटना विधानसभेला शोभणाऱ्या नाहीत. याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल,” अशी तीव्र प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले आहेत.
  • गोपीचंद पडळकर: पडळकर यांनी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मला याबाबत अतीव दुख: आहे. मी विधानभवनात याची माहिती घेत आहे,” असे त्यांनी सांगितले.
  • जितेंद्र आव्हाड: “हा माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर सुनियोजित हल्ला होता. मला स्वत:ला मारण्याचा प्रयत्न झाला,” असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे.

विधानसभा अध्यक्षांचे पाऊल

परिसरात तणाव

Leave a Reply