बारामती तालुक्यातील मोडवे नावाच्या एका छोट्याशा गावाचा सूरज चव्हाण. सूरजचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबातला. लहानपणीच सूरजला त्याचे आईवडील सोडून गेले. सूरजचे वडील वारले, त्यावेळी सूरज त्याच्या मित्रांसोबत अंगणात गोट्या खेळत होता. वडील आपल्याला कायमचे सोडून गेलेत याची समज नसलेल्या वयातच सूरज पोरका झाला होता. आई-वडिलांचं छत्र हरपलं म्हणून सूरजला अर्ध्यातून शिक्षण सोडावं लागलं. आठवीत सूरजने शाळा सोडली आणि पोटापाण्यासाठी मोलमजुरी सुरू केली. Who is Suraj Chavan who plays Big Boss-5 Marathi Guligat Dhok Bukkit Tengul?
त्याची घरातील परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला इयत्ता आठवीपर्यंतच शिक्षण घेता आलं होतं. सूरजला पाच बहिणी आहेत. यांपैकी मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला. काबाडकष्ट करून सूरज स्वत: चं पोट भरत होता. कधीकधी तर त्याला उपाशीतपाशीच झोपावं लागलं. जर टीकटॉक सूरजच्या आयुष्यात आलं नसतं तर, कदाचित सूरज मजूर म्हणूनच जगला असता. पण, टीकटॉकच्या रुपाने आलेली संधी सूरजने अचूक हेरली. एके दिवशी सूरजच्या भाच्याने त्याला टीकटॉकबद्दल माहिती दिली.
बारा लाख फॉलोवर्स म्हणजे साधी गोष्ट नव्हे…सोशल मीडियावर गंजीने युवक , युवती , क्रियेटर्स आहेत परंतु प्रत्येकालच हे जमेल असं नाही… एखाद्या मध्ये काहीतरी वेगळं असलं तेव्हाच हे सर्व शक्य होते … सोशल मीडियाचे जग अशाच लोकांना जपतं ज्यांच्यामध्ये जगाच्या वेगळ काहीतरी आहे मग ते आपल्याला जरी बावळटपणाच वाटत असलं तरीसुद्धा ते वेगळेपण आहे… काही दिवसापूर्वी सुपरस्टार अक्षय कुमार बिग बॉस मराठी शो मध्ये आला होता आणि त्याने जेव्हा गुलीगत बुक्कीत टेंगूळ असं काहीतरी बोलणाऱ्या सुरज चव्हाण ला डायलॉग म्हणायला सांगितले आणि जेव्हा सुरजने ते डायलॉग म्हटले तेव्हा अक्षय कुमार सुद्धा सुरजच्या वेगळेपणाची बरोबरी करू शकला नाही…. यालाच म्हणतात वेगळेपण….
हे वेगळेपण जपत असतांना सुरज ने कधी जगाचा विचार केला नाही… एकदा त्याच्या एखाद्या व्हिडिओवरील कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघा फॉलोवर्स असोत की इतर कुणीही.. त्याला बरेच जणं बरे वाईट बोलतात , त्याची मजा उडवितात…. आणि हे अविरतपणे चालू आहे परंतु तरीही त्याच्या साधेपणाने या सर्व गोष्टी त्याच्या मनापर्यंत , डोक्यापर्यंत जाऊ दिल्या नाही… म्हणजे त्याला त्याच्या अपमानाची जाणीवच झाली नाही… हेच सुरजचे साधंपण आणि वेगळेपण आहे….
मोलमजुरी करताना छंद म्हणून सुरू केलेले रिल्स आता सूरजला प्रसिद्धी आणि पैसा देऊ लागले. सूरजची वेगळी भाषा, बोलण्याची अजब स्टाईल, आगळ्या-वेगळ्या शब्दातले डायलॉग लोक आवडीने शेअर करू लागले. लोक सूरजला ओळखू लागली. टीकटॉकनंतर सूरज इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरही तितकाच गाजला. सूरज लोकप्रिय झाला होता. पण, तरीही त्याचा स्वभाव तसा साधाभोळाच. सूरजच्या या स्वभावाचा अनेकांनी फायदा उचलला. कार्यक्रमाला सेलिब्रिटी म्हणून बोलावलेल्या सूरजला अनेकांनी फसवलं.
कुणी त्याला ठरलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे दिलेत, तर कुणी कपड्यांच्या दुकानात उद्घाटनाला बोलवलं आणि फक्त शर्ट पॅन्ट देऊन घरी पाठवलं! सूरज चव्हाणचे शिक्षण पूर्ण झालेले नाही. तो फक्त इयत्ता आठवीपर्यंत शिकलेला आहे. तसेच त्याला व्यवहार ज्ञान बिलकुल नाही. युट्यूबवर इंस्टाग्राम या पवर फेमस झाल्यानंतर सूरजला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटने, प्रचार, इव्हेंट्स अशा ठिकाणी बोलावले जात असे. पण त्यावेळी अनेक लोकांनी सूरजच्या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला. त्याला कमी पैशात बोलावले जात असे. सूरजला व्यवहार ज्ञानाचे काही कळत नव्हते. या गोष्टीचा लोक फायदा घेत असत.
एक आई-वडील नसलेले लेकरू शरीराने आणि रूपाने जरी जास्त सुंदर नसलं तरी त्याच बिग बॉस मधील कर्तुत्व आज संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे….. जेव्हा तो बिग बॉस मध्ये गेला तेव्हा बऱ्याच महान लोकांनी म्हटले होते या वेड्याला शो मध्ये कशासाठी घेतले ??? आणि मला तर वाटते या सर्वांना त्याची उत्तरे मिळाले असतील …. आज पर्यंत आपण सर्वांनी जरी सुरज ला काहीतरी सोशल मीडियावर वेड्यासारखं करतो म्हणून कदाचित फॉलो केलं असेल…. त्याच्या व्हिडिओला लाईक दिले असतील , परंतु कुठल्याही कारणाने असो तरी आपल्या आयुष्यात त्याला स्थान होतं आणि हे स्थानच त्याला बिग बॉस सारख्या शोपर्यंत घेऊन गेल… Who is Suraj Chavan who plays Big Boss-5 Marathi Guligat Dhok Bukkit Tengul?