सुरेखा पुणेकरचा राष्ट्रवादी प्रवेश आणी प्रविण दरेकरचा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका

सुरेखा पुणेकरचा राष्ट्रवादी प्रवेश आणी प्रविण दरेकरचा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका

सुप्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर आणी शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. 16 ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. या प्रवेशाबाबत बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. दरेकर यांनी आज पुण्यातील शिरुरमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यावरुन आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिरूर येथे राजे उमाजी नाईक यांच्या 230 व्या जयंती निमित्त जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला दरेकर उपस्थित होते. Opposition Leader Praveen Darekar’s Offensive Criticism on NCP, Surekha Punekar’s NCP entry and Pravin Darekar’s ‘Rangalela galacha muka’

प्रविण दरेकर काल शिरुर दौऱ्यावर होते. राजे उमाजी नाईक यांच्या 230व्या जयंती निमित्ताने जय मल्हार क्रांती संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी दरेकर यांनी हे विधान केलं. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. Surekha Punekar’s NCP entry and Pravin Darekar’s ‘Rangalela galacha muka’ Opposition Leader Praveen Darekar’s Offensive Criticism on NCP

या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केलीय. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतेय. Surekha Punekar’s NCP entry and Pravin Darekar’s ‘Rangalela galacha muka’ Opposition Leader Praveen Darekar’s Offensive Criticism on NCP

चाकणकरांचा हल्लाबोल
दरेकर यांच्या या विधानावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. दरेकर यांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा. नाही तर आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे. Surekha Punekar’s NCP entry and Pravin Darekar’s ‘Rangalela galacha muka’ Opposition Leader Praveen Darekar’s Offensive Criticism on NCP

===============================================================================

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice