आरोग्य

महाराष्ट्रात ३ कोटी लोक लसवंत |The first dose of vaccine was given to more than 3 crore citizens

मुंबई, दि.१६: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत रात्री आठपर्यंत ६ लाख १३ हजार लसीकरण झाले. त्यामुळे आता राज्यात पहिला डोस मिळालेल्यांची संख्या ३ कोटी ४७ हजार एवढी झाली आहे. तर ८८ लाख ३७ हजार नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल्याने सर्वाधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणारे राज्य म्हणून देशात महाराष्ट्र अग्रभागी आहे.

लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर असून दोन्ही डोस दिलेल्या नागरिकांची संख्या देशात सर्वाधिक आहे. लसीकरणाला अधिक गती दिल्यास दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या लवकरच १ कोटीचा आकडा पार करू शकेल. लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा करीत असलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.

दरम्यान, आज रात्री आठपर्यंत सुमारे ६ लाख १३ हजार ८६५ एवढे लसीकरण झाले. त्यामुळे लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ३ कोटींपेक्षा अधिक झाली, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. — अजय जाधव..१६.७..२०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 3
  • Today's page views: : 3
  • Total visitors : 512,774
  • Total page views: 539,681
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice