Panchayat Samiti Chairman | माहुर पंचायत समिती पदी काँग्रेसच्या सौ अनिता कदम यांची बिनविरोध निवड
नांदेड | माहूर पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस दोन ना.मा.प्र. प्रवर्गाच्या सदस्यात पक्षांतर्गत सव्वा वर्षाच्या वाटाघाटीझाल्याने सव्वा वर्षे पूर्ण झाल्यानंतर सभापती पदाचा सौ. निलाबाई तुळशीराम राठोड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या माहूर पंचायत समितीच्या सभापती पदाची दि.१५ जून रोजी दुपारी ३:०० वा. माहूर पं.स.च्या वसंतराव नाईक सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सौ.अनिता विश्वनाथ कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार हे होते तर माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर सहाय्यक गटविकास अधिकारी आरबडवार यांनी सहकार्य केले. यावेळी उपसभापती उमेश जाधव, पं.स. सदस्य नामदेवराव कातले, पं.स. सदस्या सौ.निलाबाई तुळशीराम राठोड यांची सभागृहात उपस्थितीत होती.
सभापती पदासाठी सौ.अनिता विश्वनाथ कदम यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने पीठासीन अधिकारी पुजार यांनी सभापती पदी सौ.अनिता कदम यांची निवड झाल्याचे जाहीर करून निवडीचे प्रमाणपत्र दिले.या निवडीचा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
यावेळी जेष्ठ नेते नामदेवराव केशवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य संजय राठोड, युवक कॉंग्रेस वैद्यकीय सहाय्यता विभागाचे राज्य समन्वयक डॉ. निरंजन केशवे, किशन राठोड, निसार कुरेशी, विश्वनाथ कदम, जब्बार शेख, देविदास काळे, अजीम सय्यद संजय गायकवाड,आदीसह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
- खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री : कुणाल चांदगुडे यांच्या आई संगीता चांदगुडे होत्या युट्युबर; कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरलNew Twist in Khavdya Dongar Tragedy: Kunal Chandgude’s Mother Was a YouTuber; Family Dispute Videos Go Viral छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील
- छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुटुंबाची दुर्दैवी घटना, रागात आणि कौटुंबिक वादात संपूर्ण कुटुंबाचा अंतHeartbreaking Tragedy at Khavdya Dongar: Son Jumps, Parents Die Trying to Save Him छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज MIDC परिसरातील तिसगाव येथील
- नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ वक्तव्यावरून देशात नवा वाद: राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि लोकशाहीवरील परिणामांचा आढावाM Modi’s ‘Naxali Dimag’ Remark Sparks Debate: A Look at Political Fallout & National Security पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभारनवी दिल्ली, २६ जुलै : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET-UG) पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेमुळे देशभरात उफाळलेल्या विद्यार्थी असंतोषाच्या पार्श्वभूमीवर
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहाराच्या
