Maratha Reservation| मी मेलो तर.. टेन्शन वाढलं, जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक, पुन्हा उपचार नाकारले

Maratha Reservation| मी मेलो तर.. टेन्शन वाढलं, जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक, पुन्हा उपचार नाकारले

आंतरवली सराटी (जि. जालना) | मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. कालपासून जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. परंतु, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचं त्यांच्याबरोबर असलेल्या आंदोलकांनी सांगितलं. नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावं आणि प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रासह त्यांच्या सगेसोयऱ्यांचा आरक्षणात समावेश करावा, तसेच सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या…

Read More