Online Team:- राज्यात यंदा (२०२१-२२) राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत (गळीत धान्य) ९३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन आहे. त्यासाठी ६८ हजार ६२५ क्विंटल प्रमाणित बियाण्याची गरज आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत १० वर्षांआतील वाणांचे सोयाबीन पीक प्रात्यक्षिके राबविण्यात येतात. त्याव्यतिरिक्त १५ वर्षांपर्यंतच्या वाणांचे प्रमाणित बियाणे अनुदानावर वितरित करण्यात येते. या अभियानांतर्गत २०२१-२२ साठीच्या नियोजित वार्षिक कृती आराखड्यानुसार त्यासाठी अनुक्रमे २६ हजार ६२५ क्विंटल आणि ४२ हजार क्विंटल प्रमाणित सोयाबीन बियाण्याची गरज असणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत (गळीत धान) १० वर्षांआतील सोयाबीन वाणांचे सलग पीक प्रात्यक्षिकांचे २७ हजार ५०० हेक्टरवर नियोजन आहे. त्यासाठी प्रतिहेक्टरी ७५ किलो याप्रमाणे २० हजार ६२५ क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे.
कडधान्य आंतर पीक प्रात्यक्षिकांतर्गत तूर अधिक सोयाबीनची १० हजार हेक्टरवर प्रात्यक्षिके नियोजित आहेत त्यासाठी प्रति हेक्टरी ६० किलो याप्रमाणे ६ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे. सोयाबीनच्या १० वर्षांआतील वाणांची एकूण ३७ हजार ५०० हेक्टरवर प्रात्यक्षिके घेण्यात येतील त्यासाठी २६ हजार ६२५ क्विंटल बियाण्याची गरज आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत (गळीत धान्य) सोयाबीनच्या १५ वर्षांआतील वाणांचे ५६ हजार हेक्टरवर पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन आहे. त्यासाठी बियाणे वितरणासाठी प्रतिहेक्टरी ७५ किलो प्रमाणे ४२ हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. १० आणि १५ वर्षांआतील सोयाबीन वाणांचे मिळून एकूण ९३ हजार ५०० हेक्टरवरील पीक प्रात्यक्षिकांसाठी ६८ हजार ६२५ क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे.
७२ हजार क्विंटल प्रमाणित बियाणे
यंदा ‘महाबीज’कडून सोयाबीनच्या १० वर्षांआतील वाणांचे २१ हजार ९५४ क्विंटल आणि १० ते १५ वर्षांआतील वाणांचे ४४ हजार ७२५ क्विंटल असे एकूण ६६ हजार ६७९ क्विंटल बियाण्याची उपलब्धता आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळातर्फे १० वर्षांआतील वाणांचे ४ हजार क्विंटल आणि १० ते १५ वर्षांआतील वाणांचे २ हजार ५०० क्विंटल मिळून एकूण ६ हजार ५०० क्विंटल बियाण्याची उपलब्धता आहे. ‘महाबीज’ आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे मिळून एकूण ७२ हजार ६७९ क्विंटल प्रमाणित बियाणे उपलब्ध आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
परभणी ः राज्यात यंदा (२०२१-२२) राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत (गळीत धान्य) ९३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन आहे. त्यासाठी ६८ हजार ६२५ क्विंटल प्रमाणित बियाण्याची गरज आहे.

[ad_2]