कोव्हीड-१९ Covid-19 रोगाचा शरिरातील प्रवास खालील चित्र व माहिती पहा.

कोव्हीड-१९ Covid-19 रोगाचा शरिरातील प्रवास खालील चित्र व माहिती पहा.

स्टेज १:  शरीरात व्हायरस वाढणे, सौम्य लक्षणे (ताप, थकवा, धाप लागणे). RT-PCR  मध्ये व्हायरस दिसू लागतो. 

स्टेज  २: व्हायरसचे शरीरात मोठे प्रमाण, चेस्ट एक्स रे किंवा सिटी स्कॅन पॉझीटीव्ह : “दुधट/धूसर” प्रतिमा  (कारण फुफ्फुसांची हानी सुरु). 

स्टेज ३: फुफ्फुसात पाणी भरणे (न्यूमोनिया), सायटोकाइन्स चे “वादळ”, श्वसनाचा तीव्र रोग, “सिरीयस” स्थिती. 

आता प्रश्न येतो: कुठे कोणता उपचार आणि औषध वापरावे:

याचे साधारण ठोकताळे असे:

स्टेज १ (आणि स्टेज २ चा सुरवातीचा काळ) (दोन्ही  मिळून, इन्फेक्शननंतरचे  साधारण चार-पाच दिवस) : व्हायरस-नाशके: रेम डेसीव्हीर , फेवीपिरावीर , प्लाझ्मा.  डी डायमर  च्या आकड्यावर आधारित रक्त-गुठळ्याविरोधी औषधे कोवीड रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांकडूनच कोवीड उपचार करण्याची परवानगी असलेल्या रुग्णालयातच

स्टेज २ ; स्टीरॉईड्स ( डेक्झामिथाझोन , मिथाईल-प्रेडनिसोलोन), ऑक्सिजन कोवीड रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांकडूनच कोवीड उपचार करण्याची परवानगी असलेल्या रुग्णालयातच

स्टेज ३: मेलेल्या पेशी आणि व्हायरस यामुळे फुफ्फुसात पाणी भरल्यावर, तिथली ऑक्सिजन (आतमध्ये) आणि कार्बन डाय ऑकसाईड  वायू (बाहेर) ही देवघेव बंद होऊ लागते. हा अडसर जसजसा वाढतो, तसतसे “वरून” ऑक्सिजन दिल्यास , त्या प्रमाणात रक्तात तो उतरण्याचे प्रमाण कमीकमी होऊ लागते. इथे उपचार म्हणजे हे पाणी हटविणे हा आहे. (नाहीतर  बाहेरून दिलेला ऑक्सिजन म्हणजे “पालथ्या घड्यावर पाणी” असे होईल!).  शरीर आपण होऊन हे करतेच. इन्फ्लमेशन  कमी करायला स्टिरॉइड वापरले जाते. कोवीड रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांकडूनच कोवीड उपचार करण्याची परवानगी असलेल्या रुग्णालयातच

बाकी उपचार लक्षणांनुसार (“symptomatic”).

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice