The third grave at the foot of Pratapgad belongs to Krishna Bhaskar Kulkarni – Sambhaji Brigade
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबर परिसरात तीन कबरी आढळल्या आहेत. यातील तिसरी कबर कोणाची याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी ही तिसरी कबर कोणाची याबाबत मोठा दावा केलाय.
“ही तिसरी कबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची असावी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पहिला वार अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने केला होता,” असं संतोष शिंदे म्हणाले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
सतोष शिंदे म्हणाले, “अफजल खानाच्या कबरीशेजारी आणखी दोन-तीन कबरी सापडल्या. याचा अर्थ त्या पहिली कबर अफजल खान, दुसरी सय्यद बंडा आणि तिसरी कदाचित कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची असावी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पहिला वार करणारा अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता.”
“कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने हल्ला केल्यामुळे महाराजांनी एका कुलकर्णीचे दोन कुलकर्णी केले होते. कुलकर्णी जागेवर संपवला होता,” असंही संतोष शिंदे यांनी म्हटलं.
हे ही वाचा —–
- महाराष्ट्र विधिमंडळ सन २०२४ चे हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजले; प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले, 13 विधेयके संमत – वाचा मंजूर विधेयके व सविस्तर कामकाज
- फडणवीस- शिंदे- पवार महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर, पहा कोणाला कोणते मंत्रिपद मिळाले
- धनंजय मुंडे यांना तात्काळ मंत्रीपदावरुन हटवा अजित पवार समोर मस्साजोग गावकऱ्यांचा टाहो
- Devendra Fadnavis say on Santosh Deshmukh Case पाळेमुळे उखडून टाकू, वाल्मिक कराडला सोडणार नाही; दोन प्रकारची चौकशी. आयजी अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी व न्यायालयीन चौकशी.
- खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी; भाजपच्या खासदाराने मला मारल,धक्काबुक्की करत होते- राहुल गांधी